दैनंदिन घरचा अभ्यास

Sunil Sagare
25
लॉकडाऊन च्या काळात विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करणे सोपे जावे आणि पालकांनाही आपल्या पाल्याचा अभ्यास घेणे सोपे व्हावे म्हणून दैनंदिन घरचा अभ्यास या सदरामध्ये  इयत्ता पहिली ते सातवी चा दैनंदिन घरचा अभ्यास असणाऱ्या पीडीएफ फाईलआपणास उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थी अभ्यासाचे हे दैनंदिन नियोजन बनवताना विद्या परिषदेने पुरविलेल्या विद्यार्थी दिनदर्शिकेचा आधार घेण्यात आलेला आहे. गरज असेल तेथे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे जावे म्हणून नियोजनात थोडा बदलही केला आहे.
दैनंदिनअभ्यासाशी संबंधित युट्युब लिंक गरज असेल तेथे दिलेल्या आहेत.  प्रत्येक वर्गाच्या फाईल बनवताना विद्यार्थ्यांना करण्यास सोयीचा व कमीत कमी मोबाईल चा वापर होईल आणि जास्तीत जास्त पाठ्यपुस्तकाचा वापर विद्यार्थी करतील अशा पद्धतीने अभ्यासाची मांडणी केली आहे. विद्यार्थी अभ्यास करताना पाठ्यपुस्तकाचा वापर वाढावा आणि मोबाईल वरील वेळ कमी व्हावा म्हणून प्रश्न सोडवताना लागणारी चित्रे, माहिती इत्यादी साठी प्रत्यक्ष माहिती व चित्र न देता त्या चित्र अथवा माहितीशी संबंधित पाठ्यपुस्तकातील पान क्रमांकाचा उल्लेख जागोजागी केला आहे. अगदी जेथे खरोखरच मार्गदर्शनाची अथवा संदर्भाची गरज आहे जसे एखाद्या कवितेची चाल, एखादी नवीन व किचकट संकल्पना या समजण्यास सोप्या जाव्या म्हणून संबंधित घटकाशी संबंधित व्हिडीओ अथवा इतर लिंक दिलेली आहे. लिंक दिलेल्या ओळी या निळ्या रंगाच्या व अधोरेखित केलेल्या आहेत. या ओळीवर क्लिक अथवा या ओळीला टच केल्यास संबंधित घटकाचा व्हिडीओ अथवा पेज आपोआप सुरु होईल. अशा वेळी तुमच्या मोबाईल मधील इंटरनेट ची सुविधा चालू असणे गरजेचे आहे.
दिनदर्शिकेतील नियोजनाशिवाय इयत्ता पहिली, दुसरी व तिसरीचा खेळू, करू शिकू चा स्वाध्याय आणि इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गांसाठी इतर विषयांबरोबर हिंदी विषयाचा अभ्यासही देत आहोत.
शाळा बंद काळात विद्यार्थ्यांच्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग व्हावा आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे यादृष्टीने विद्यार्थ्यांना हे दैनिक नियोजन खूपच उपयोगी पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
खाली दिलेल्या अभ्यासाच्या फाइल्स कशा वाटल्या?, त्यामध्ये आणखी काही बदल, दुरुस्ती अथवा सुधारणा हवी असल्यास पोस्ट खाली कमेंट देऊन आपण जरूर कळवा.

विद्यार्थीअभ्यासाच्या वर्गनिहाय दिनदर्शिका येथे उपलब्ध आहेत.
या पोस्ट मधील फाइल्स डाउनलोड करण्यास काही अडचण आल्यास आमच्या गुरुमित्र या टेलिग्राम ग्रुप वर तुम्हाला पिन केलेल्या पोस्ट स्वरूपात भेटतील. टेलिग्राम ग्रुप वरही दैनिक घरचा अभ्यास रोज पाठवला जातो. टेलिग्राम ग्रुप चे सदस्य होण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.

जर तुम्ही टेलिग्राम अॅप वापरत नसाल तर आजच प्ले स्टोर वरून टेलिग्राम अॅप डाउनलोड करून घ्या.

 इयत्तानिहाय पहिली ते सातवीचा दैनंदिन अभ्यास पीडीएफ फाइल्स खालील पेज वर उपलब्ध आहेत.










Post a Comment

25 Comments
  1. सरजी खूपच छान उपक्रम हाती घेतला आहे. आपले कार्य या आपत्कालीन काळात एक स्तुत्य उपक्रम आहे. मनस्वी अभिनंदन आणि पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा.

    आपला मित्र,
    श्री.सिराज सर
    9421159305

    ReplyDelete
  2. आठवी पर्यंत प्राथमिक शिक्षण आहे,आठवी अँड करावी.

    ReplyDelete
  3. खूपच उपयुक्त सर

    ReplyDelete
  4. इयत्ता 8 वी चा अभ्यास पाठवा सर 🙏

    ReplyDelete
  5. सर English medium चा ही अभ्यास आहे का

    ReplyDelete
  6. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अध्यापन

    इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना प्लीज हे शेअर करा👇🔴



    https://www.youtube.com/channel/UCS6wO6RdqlDiQNn5neQHpDw



    *लाल बटन असलेल्या सबस्क्राईब बटणावर दाबावे
    *
    व सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर दाबावे .


    त्यामुळे मुलांना पुढील व्हिडिओ आल्यावर नोटिफिकेशन मिळेल

    ReplyDelete
  7. https://www.youtube.com/channel/UCS6wO6RdqlDiQNn5neQHpDw

    ReplyDelete
  8. सरजी खूपच छान उपक्रम हाती घेतला आहे. आपले कार्य या आपत्कालीन काळात एक स्तुत्य उपक्रम आहे. मनस्वी अभिनंदन आणि पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा.
    shetti Padmabhushan

    ReplyDelete
  9. sar vare thanks forthe yuoar gaedling and the przant sechvashan your grad agan goog wark

    ReplyDelete
  10. चांगला उपक्रम आहे सर.🙏🙏

    ReplyDelete
  11. 8 च्या वर्गाची पण PDF टाकावी

    ReplyDelete
  12. उपक्रम छान आहे.
    रोजचा अभ्यास इमेलवर मिळण्यास विनंती आहे.

    ReplyDelete
Post a Comment
To Top