गुगल मीट

गुगल मीट (Google Meet) अॅप कसे वापरावे?


जसजसा कोविड १९ संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. तसेतसे सामाजिक अंतर ठेवणे अधिक अधिक गरजेचे होत चालले आहे. याचाच एक भाग म्हणून वर्क फ्रॉम होम ही संकल्पनाही अधिक अधिक प्रचलित होत चालली आहे. घरी बसूनच अनेकजन घरी बसूनच कार्यालयीन कामे करत आहेत. शाळा बंद असल्याने विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. यासाठी प्रत्येकालाच ऑनलाइन मिटिंग करावी लागत आहे. विद्यार्थ्यांचेही ऑनलाइन तास शिक्षक घेत आहेत. गुगल मीट, झूम, जिओ मीट यासारखी अनेक ऑनलाइन मिटिंग घेण्यासाठी सोयीची ठरणारी अॅप ही प्ले स्टोर वर मोफत उपलब्ध आहेत. झूम हे प्रसिद्ध व्हिडीओ मिटिंग अॅप पूर्वीपासूनच मोफत वापरासाठी उपलब्ध होते.
 कोविड १९ संसर्ग वाढल्यामुळे अशा व्हिडीओ मिटिंग अॅप चा वापर आणि मागणीही वाढली. हे लक्षात घेऊन गूगल नेही त्यांची गुगल मीट ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्याच बरोबर  जिओ नेही त्यांचे नवीन अॅप नुकतेच प्ले स्टोर वर उपलब्ध केले आहे. वरील तिन्ही अॅप पैकी 'गुगल मीट(Google Meet)' हे अॅप वापरायला सोपे व सुटसुटीत आहे. हे अॅप प्ले स्टोर वर मोफत उपलब्ध आहे.

या लेखामध्ये आपण गुगल मीट हे अॅप कसे वापरावे याविषयी माहिती करून घेणार आहोत.

ऑनलाइन मिटिंग सुरु करण्यासाठी मिटिंग घेणारा व्यक्ती सर्वप्रथम मिटिंग सुरु करतो व त्याची लिंक ई-मेल, व्हाट्स
अॅप अथवा इतर माध्यमातून इतर सदस्यांपर्यंत पोचवतो. मिटिंग ची लिंक खालील प्रमाणे दिसते. ही लिंक क्लिक करण्यापूर्वी आपल्या मोबाईल मध्ये गुगल मीट अॅप घेतलेले असणे गरजेचे आहे. आहे.

वरील चित्रात दाखवलेल्या लिंक वर क्लिक केल्यास खालील प्रमाणे डायलॉग येईल. त्यात ही लिंक कोठे चालू करायची याची विचारणा केली जाईल.

वरील प्रमाणे डायलॉग मधून बाणाने दर्शविलेल्या मीट या अॅप वर क्लिक करा. तुमचे गुगल मीट अॅप चालू होईल. तुम्ही जर पहिल्यांदाच मीट अॅप वापरत असाल तर खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल. यातील Continue क्लिक करा.

जर तुमच्या मोबाइल मध्ये आधीपासूनच गूगल मीट अॅप असेल व ते याआधीही वापरले गेले असेल तर दुसर्‍यांदा परवानगीची स्क्रीन येणार नाही, थेट Ask to join बटन असणारी स्क्रीन तुम्हाला दिसेल.

Continue वर क्लिक केल्यानंतर खालील चित्रात दाखवल्या प्रमाणे मीट अॅप काही माईक व कॅमेरा वापरण्याची परवानगी मागेल.


बाण दाखविलेल्या Allow बटन वर क्लिक करा. अशी परवानगी दोन वेळा विचारली जाईल. दोन्ही वेळा Allow बटन दाबा. त्यानंतर खालील प्रमाणे स्क्रीन येईल.

स्क्रीनवर कॅमेरा चालू होईल त्याखालील वरील चित्रांत दाखवल्याप्रमाणे Ask to join या बटनावर क्लिक करा.
थोड्याच वेळात तुम्हांला मिटिंग मध्ये सहभागी करून घेतले जाईल. मिटिंग सुरु झाल्यानंतर खालीलप्रमाणे स्क्रीन दिसेल. आता तुम्ही मिटिंगमध्ये मध्ये सहभागी झाले आहात. तुम्हाला तुमच्या स्क्रीन मिटिंग मध्ये सहभागी सर्व व्यक्तींचे लाईव्ह चेहरे दिसतील व त्यांचे बोलणेही ऐकू येईल. व तुम्हीही त्यांच्याशी बोलू शकता.
 
  वरील चित्रात दाखवल्या प्रमाणे मिटिंग/वर्ग चालू असताना स्क्रीन वर काही बटनही दिसतील. त्यांचे क्रमाने उपयोग आता जाणून घेऊया.

१. एक क्रमांकाच्या बाणाने दाखवलेले बटन हे माईक चे आहे. त्याने आपला माईक चालू किंवा बंद करता येतो. चित्रात माईक बंद स्थितीत दाखवला आहे. माईक बंद असताना तुमचे बोलणे इतरांना ऐकू जात नाही. मिटिंग मध्ये अनेक व्यक्ती सहभागी असल्यामुळे अनेक लोक एकदाच बोलल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होते. अशा वेळी किंवा कोणी एक व्यक्ती आपले मत मांडताना आपला माईक बंद ठेवावा. आपण बोलणार आहोत त्याच वेळी माईक चालू ठेवावा.

२. दोन क्रमांकाच्या बाणाने दाखवलेले बटन दाबून मिटिंग मधून आपण बाहेर पडू शकतो. परत एकदा मिळालेली लिंक क्लिक करून आपण परत मिटिंग मध्ये जॉईन होऊ शकतो.

३. तिसऱ्या क्रमांकाच्या बाणाने दाखवलेले बटन वापरून आपण आपला कॅमेरा बंद किंवा चालू करू शकतो. कॅमेरा बंद केल्यास आपल्याला सर्व व्यक्ती दिसतील. मिटिंग मधील संवादही ऐकू येईल, पण तुम्ही इतरांना दिसणार नाही. त्या ठिकाणी तुमचे नाव दिसेल.
वरील मुलभूत माहिती गुगल मिट वापरण्यासाठी पुरेशी आहे. या माहितीचा वापर करून आपण कोणत्याही अडचणी शिवाय ऑनलाइन मिटिंग /वर्गाला हजर राहू शकता.

४. चौथ्या क्रमांकाच्या बाणाने दर्शविलेले बटन टच केल्यास कॅमेरा स्क्रीनखाली खालील चित्रात दाखविल्या प्रमाणे मेनू दिसेल. यातील बाणाने दर्शविलेले दोन मेनू मीटिंग मध्ये आपल्याला काही सादर करायचे असल्यास उपयोगी पडतात.

१. पहिल्या बाणासमोरील switch camera हे बटन वापरुन फोन चा पुढील अथवा मागील कॅमेरा आपण मीटिंग मध्ये व्हीडीओ दाखवण्यासाठी बदलू शकतो.

२. दुसर्‍या क्रमांकाचे बटन present screen वापरुन तुम्ही तुमच्या मोबाइल ची स्क्रीन मीटिंग मध्ये शेअर करू शकता. कधी कधी मीटिंग मध्ये मार्गदर्शन करताना अथवा माहिती सांगताना मोबाइल मधील एखादे अॅप, चित्र अथवा सादरीकरण दाखवावे लागते. अशा वेळी present screen हे बटन खूप उपयोगी ठरते.

मीटिंग चालू असताना मुख्य कॅमेरा स्क्रीन खाली खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे ३ टॅब दिसतात. त्यांचा वापर कसा होतो ते आपण पाहू.

१.   पहिल्या बाणावरील टॅब सुरुवातीपासूनच चालू असतो. या टॅब वर मीटिंग मध्ये सहभागी सर्व सदस्यांचे लाईव्ह प्रक्षेपण व त्यासमोर त्यांचे नाव असणारी यादी दिलेली असते.

२.  दुसर्‍या बाणावरील टॅब मधून आपल्याला मीटिंग मधील सर्व सदस्यांसोबत चॅट करता येते. मेसेज पाठवता येतो. पाठवलेला मेसेज सर्व सदस्य वाचू शकतात.

३. तिसर्‍या बाणावरील टॅब मध्ये मीटिंग ची लिंक दिलेली असते. येथून मीटिंग ची लिंक शेअर करून इतरांना मीटिंग साठी निमंत्रित करता येते.

या लेखामधून गूगल मीट मधील सर्व महत्वाच्या मेनुंची सविस्तर माहिती आपण घेतली आहे. ही माहिती वाचल्यानंतरआपणास गूगल मीट वापरताना आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. अशी अपेक्षा व्यक्त करतो. हा लेख कसा वाटला याचा अभिप्राय कमेंट मध्ये द्यायला विसरू नका.

Post a Comment

6 Comments
Post a Comment
To Top