राज्यातील तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक चॅनल सुरु : शिक्षण मंत्र्यांची घोषणा

Sunil Sagare
0
राज्यातील तिसरी ते बारावीच्या प्रत्येक वर्गांसाठी एकूण १२ शैक्षणिक चॅनल सुरु केल्याची घोषणा आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. याचा फायदा राज्यातील मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू माध्यमात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे. शाळा बंद असताना ही विद्यार्थ्याचे शिक्षण निरंतर चालू ठेवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. डी. डी. सह्याद्री वाहिनीवर 'टिलीमिली' ही पहिली ते आठवी वर्गांसाठी शैक्षणिक मालिका, जिओ सावन वर 'महावाणी' रेडीओ चॅनल ही सुरु केले आहेत.
ज्ञानगंगा या नावाने जिओ टी.व्ही. अॅप वर पहिली ते १२ वी च्या वर्गांसाठी वर्ग व माध्यमानुसार विविध १२ शैक्षणिक चॅनल सुरु झाल्याची माहिती आज देण्यात आली. हे सर्व चॅनल विद्यार्थ्यांना जिओ टी.व्ही. अॅपवर ऑनलाइनपाहता येणारआहेत.यासाठी पालकांकडे जिओ सीम असणे आवश्यक आहे.प्रत्येक चॅनल वर दररोज ६तास शैक्षणिक अभ्यासक्रम  प्रसारित  करण्यात येणार असून तोच कार्यक्रम नंतर दिवसभर पुनर्प्रसारीत केले जातील. याशिवाय आधीचा कार्यक्रम पाहण्याची सोय ही जिओ टी.व्ही.वरअसल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार अभ्यासाचे कार्यक्रम पाहता येणार आहेत.  मागील कार्यक्रमांच्या यादीमध्ये मागील आठ दिवसांचे कार्यक्रमही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे ज्याने ४ माध्यमांसाठी शैक्षणिक चॅनल सुरु केले आहेत.

सुरु केलेल्या चॅनल ची वर्ग व माध्यम निहाय यादी खालील प्रमाणे आहे.

1) ज्ञानगंगा - इ.३ री व ४ थी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
2)  ज्ञानगंगा - इ.५ वी  मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
3)  ज्ञानगंगा - इ.६ वी  मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
4)  ज्ञानगंगा - इ.७ वी  मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
5) ज्ञानगंगा - इ.८ वी  मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
6) ज्ञानगंगा - इ. ९ वी मराठी माध्यम
7) ज्ञानगंगा - इ. ९ वी इंग्रजी माध्यम
8) ज्ञानगंगा - इ. ९ वी उर्दू माध्यम
9) ज्ञानगंगा - इ. १० वी उर्दू माध्यम
10) ज्ञानगंगा - इ. १० वी मराठी माध्यम
11) ज्ञानगंगा - इ. १० वी इंग्रजी माध्यम
12) ज्ञानगंगा - इ.१२ विज्ञान

सदर चॅनल पाहण्यासाठी जिओ टी.व्ही या अॅप वर Category मधून Educational निवडा व वरील चॅनल मधील आपल्याला पाहावयाचा वर्गाचे चॅनल निवडा.
 जिओ टी.व्ही वर प्रक्षेपित होणारे सर्व व्हिडीओ आपणास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या यु ट्यूब चॅनल वर देखील उपलब्ध होतील.

याच बरोबर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत विविध ई-शैक्षणिक साहित्य पोहोचविण्यासाठी जिओ चॅट अॅप वर एक चॅनल सुरु केले असून या चॅनल वर परिषदेकडून प्रसारीत होणाऱ्या अभ्यासमाला, प्रशिक्षणे, अवांतर वाचनाची पुस्तके, विविध शासन निर्णय प्रसारित केले जात आहेत. परिषदेचे हे चॅनल जॉईन होण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये जिओ चॅट अॅप असणे आवश्यक आहे. त्यानंतर
या लिंक वर क्लिक करून आपण चॅनल चे सदस्य होऊ शकता.
 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top