कोविड 19 च्या संसर्गामुळे शाळा बंद आहेत.
या बंद काळात मुलांचे शिक्षण चालू ठेवणे हे पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन आणि शासनासमोरील यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. यातील प्रत्येक घटक आपल्या परीने विविध पद्धतीने मुलांचे शिक्षण निरंतर चालू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ऑनलाइन शैक्षणिक अॅप्लिकेशन, टेलिव्हिजन, रेडियो यासारख्या माध्यमातून घरबसल्या विद्यार्थी कसे शिकतील यासाठी सर्वजण कार्यरत आहेत.
याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन अभ्यासिका देण्याचा उपक्रम या ब्लॉग च्या माध्यमातून राबवित आहोत.
घरच्या घरी अभ्यास देताना शिक्षक व पालकांनी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. या गोष्टींची काळजी घेतली तरच घरातील अभ्यास अधिक प्रभावी होईल. खालील काही सूचना आपणास मार्गदर्शक ठरतील.
स्मार्टफोन /अथवा संगणक हे पुस्तक, वही याप्रमाणे अभ्यासाचे एक साधन आहे. एखादी संकल्पना समजून घेण्यासाठी व शिक्षकांशी संपर्क ठेवण्यासाठी तो वापरावा. विद्यार्थ्याचा संपूर्ण अभ्यासच त्यावर पूर्ण होतो असे अजिबात नाही.
विद्यार्थी अभ्यास करताना तो स्मार्टफोन/ संगणक/टीव्ही चा वापर योग्य प्रकारे करतोय कि गैरवापर करतोय याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
अभ्यासाचे विवरण शिक्षक/शाळेकडून प्राप्त करून घेणे, संकल्पना समजून घेण्यासाठी इंटरनेट वापरणे झाल्यानंतर सरावासाठी वही, पुस्तक यांचा वापर करण्यास सांगावे, त्यामुळे फोनशी मुलाचा संपर्क कमी येईल.
फोनवर व्हिडिओ / शैक्षणिक खेळ /ऑनलाइन चाचणी पेक्षा प्रत्यक्ष कृती वर अधिक भर द्यावा.
स्मार्टफोन हे शिकण्याच्या साधनपैकी फक्त एक संदर्भ साधन आहे, त्यामुळे अभ्यास करता येणारच नाही असे नाही.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा विचार करता एका दिवसात किती वेळ डिजिटल अभ्यास करावा यासाठी इयत्ता नुसार खालील प्रमाणे मर्यादा ठरवण्यात आली आहे. तसेच हा मर्यादित तासांचा वेळही सलग न देता मध्ये मध्ये त्यांना मोकळा वेळ घेण्यास सांगावे.
(अ) पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी व इयत्ता १ ली व २ री च्या विदयार्थ्यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करू नये. मात्र त्यांना टी.व्ही. व रेडिओवरील उपलब्ध शैक्षणिक कार्यक्रम दाखवावेत / ऐकवावेत.
(ब) इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी कमाल १ तास प्रतिदिन
(ब) इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी कमाल १ तास प्रतिदिन
(क) इयत्ता सहावी ते आठवीसाठी कमाल २ तास प्रतिदिन
(ड) इयत्ता नववी ते बारावीसाठी कमाल ३ तास प्रतिदिन
ठरलेले तास पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुस्तक, वही इत्यादि पारंपरिक साधनांचा वापर करून अभ्यास करण्यास सांगावे.
इयत्ता 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी दि. 29/06/2020 साठीचा घरचा अभ्यास खालील तक्त्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता
खूप सुंदर उपक्रम सर....👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteआणि उपयुक्तही..👍🏻👍🏻
very nice
ReplyDeleteखुप छान कार्यक्रम राबवीत आहात तुम्ही सर
ReplyDeleteसर खूप छान उपक्रम आहे
ReplyDeleteआठवी चा अभ्यास टाका
आदरणीय श्री.सुनिलभाऊ,
ReplyDeleteतुमच्या दैनंदिन अभ्यास pdf खुपच सुंदर असतात ,
तुम्ही करत असलेले शैक्षणिक कार्य लाखमोलाचे आहे !
आपल्या कार्यास महाराष्ट्र शिक्षक मित्र परिवारातर्फे मानाचा मुजरा व हार्दिक शुभेच्छा !!!
शुभेच्छूक- शिवचंद्र गिरी यवतमाळ
महाराष्ट्र शिक्षक मित्र
💐🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹💐