कोविड-19 रोगाच्या साथीमुळे शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही आणखी शाळा सुरू झालेल्या नाहीत. या कालावधीत विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून राज्य शासन, शाळा व शिक्षक शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत.
विद्यार्थ्यांना दीक्षा अॅप, रेडियो, टेलिव्हीजन, शिकण्यासाठी शिक्षण व्यवस्था प्रेरित करीत आहेत. यासाठी राज्य सरकारही नियोजन करीत आहे.
याच शासकीय प्रयत्नाचा भाग म्हणून जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचा अभ्यास पूर्ण व्हावा म्हणून राज्य सरकारने इयत्ता व विषयनिहाय नियोजन असलेली शैक्षणिक दिनदर्शिका प्रसिद्ध केली आहे. शिक्षकांना वापरायला व वितरित करायला सोपे व्हावे म्हणून या दिनदर्शिकेचे इयत्तानिहाय वेगवेगळे दहा भाग करून उपलब्ध करून दिले आहेत.
शिक्षकांसाठी सूचना :
1. शैक्षणिक दिनदर्शिका सर्व शिक्षकांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावी.
2. शैक्षणिक दिनदर्शिका विद्यार्थ्यांनी वापरायला सुरु करण्यापूर्वी शिक्षकांनी सर्व वापरकर्ता विद्यार्थ्यांशी व पालकांशी फोन, व्हिडीओ कॉल, ग्रुप कॉल,कॉन्फरन्स कॉल करुन संवाद साधावा आणि शैक्षणिक दिनदर्शिका वापरून अभ्यास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करावे.
3. वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना फक्त अभ्यासबद्दल बोलू नये. हा संवाद अनौपचारिक असावा.
विद्यार्थी, कुटुंब, सध्याची दिनचर्या व घरात सध्या स्वीकारलेली जबाबदारी, आजूबाजूच्या परिस्थितीबाबत त्याचे मत याबद्दल चर्चा करून शिक्षक - विद्यार्थी संबंध दृढ होतील याची काळजी घ्यावी.

4. वर्गशिक्षकांनी, विषयशिक्षकांनी पाठ शिकताना पुस्तकाचा कसा वापर कसा करावा याबद्द्ल सूचना द्याव्यात.
5. प्रत्येक पाठाचे ई-साहित्य बघण्यापूर्वी व बघितल्यानंतर काय करावे याबद्दलही विद्यार्थ्यांना सांगावै.
6. त्याचप्रमाणे पाठातील ई-साहित्याशी संबंधित समांतर उपक्रम आणि स्वाध्याय ह्याबाबतीत विद्यार्थ्यांशी संवाद साधावा.
7. नियमित अभ्यासाला पर्याय म्हणून आपण दीक्षा ऍपचा वापर आपण करत नाही आहोत तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रियेतून जे विद्यार्थ्यांचे अध्ययन घडते त्याला पूरक साहित्य किंवा शैक्षणिक साहित्य म्हणून ई-साहित्याचा वापर करणे अपेक्षित आहे.
8. शैक्षणिक दिनदर्शिकेमध्ये देण्यात आलेल्या कृतीशिवाय शिक्षकांनी आपल्या स्तरावर इतर आवश्यक कृती व उपक्रम विद्यार्थ्यांना पुरविण्यास हरकत नाही.

शैक्षणिक दिनदर्शिका वापरण्यासाठी विद्यार्थी व पालक यांच्याकरिता महत्वाच्या सूचना :
1. शैक्षणिक दिनदर्शिका म्हणजे पाठ्यपुस्तकातील पाठांवर आधारित नियोजन असून त्याचा उद्देश विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ करणे हा आहे.
2. शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार अध्ययन करताना यावर्षी आपल्याला पुरवलेल्या नवीन पाठ्यपुस्तकांचा उपयोग करावा.
3.
दीक्षाऍप पाहण्यापूर्वी एकदा पाठ्यपुस्तकातून संबंधित पाठ वाचावा. त्याचप्रमाणे ई-साहित्य पाहिल्यानंतरही ई साहित्यातील अध्ययन घटक पुन्हा वाचणे अधिक फायदेशीर ठरेल.
4. पाहिलेल्या आणि वाचलेल्या अध्ययन घटकांत काही समस्या असल्यास ती आपले पालक, घरातील ज्येष्ठ व्यक्ती, मोठे बहीण-भाऊ शिक्षक यांच्याशी चर्चा करावी.
5. एक पाठ अभ्यासून संपल्यानंतर त्यावरील स्वाध्याय पूर्ण करावा व शक्य झाल्यास तो घरातील ज्येष्ठांकडून तपासून घ्यावा.
6. दररोज प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्याची सवय लावून घ्या.
7. ठराविक कालावधीनंतर शिक्षकांनी पाठवलेल्या चाचण्याही सोडवा.
8. ई-साहित्य वापरताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सानिध्यातच रहा.
9.
ई-साहित्य सलगपणे न पाहता प्रत्येक विषय संपल्यानंतर थोडी विश्रांती घ्या. मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट काही वेळासाठी दूर ठेवा.
10. इ.१ ली व २ रीच्या विद्यार्थ्यांनी दीक्षा ऍप व पाठ्यपुस्तक घरातील वडीलधाऱ्या मंडळींच्याच मदतीने वापरायचे
आहे.
11. आवश्यक तेथे सांगितलेल्या कृती, प्रयोग किंवा उपक्रम करण्यापूर्वी वडीलधाऱ्या मंडळींवा त्याची कल्पना द्या अथवा त्या कृती किंवा उपक्रम त्यांच्या मदतीनेच करा.
12. शैक्षणिक दिनदर्शिकेमधील लिंक open होत नसल्यास सदर घटकाशी संबंधित ई-साहित्य DIKSHA APP च्या माध्यमातून आपणास पाहता येईल. यासाठी DIKSHA APP आपल्या मोबाईल मध्ये DOWNLOAD करून घ्यावे. तसेच पाठ्यपुस्तकामध्ये देण्यात आलेल्या QR CODE DIKSHA APP मधून SCAN करूनही पाहता येईल.

खालील लिंक वर क्लिक करून दीक्षा अॅप डाउनलोड करा
खालील लिंक वर क्लिक करून आपणास हव्या त्या इयत्तेची मार्गदर्शिका आपण डाऊनलोड करू शकता..
सर
ReplyDeleteआपण खुप वेळ देवून चांगले काम करत आहात आपल्या कार्यास सलाम.धन्यवाद सर
अतिशय छान सर
ReplyDeleteअतिशय सुंदर सर
ReplyDeleteYou are doing Very good and important work
ReplyDeleteसर तुमचे कार्य आदर्श आहे
ReplyDeleteसर तुमचे कार्य आदर्श आहे
ReplyDeleteपरिपूर्ण आणि निस्वार्थी कार्य सलाम तुमच्या कार्याला
ReplyDelete