स्वागत

Sunil Sagare
5
ज्ञान वाहिनी या शैक्षणिक ब्लॉगवर शिक्षक मित्रांचे मनःपूर्वक स्वागत......
शिक्षकांसाठी एक शैक्षणिक व्यासपीठ म्हणून या ब्लॉग वर विविध शैक्षणिक लेख, शिक्षक मित्रांना उपयोगी अशी विविध सॉफ्टवेअर्स, शैक्षणिक ॲप्स, विविध प्रकारच्या शैक्षणिक फाईल यांचे आदान-प्रदान करण्याच्या हेतूने मी हा ब्लॉग बनवला आहे. आपल्याला अनेक वेळा कार्यालयीन कामासाठी वेळ द्यावा लागतो, तोच वेळ वाचवायचा असेल, काम अधिक सुटसुटीत आणि अचूक होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यालयीन कामाचा बऱ्यापैकी वेळ आपण वाचवू शकतो. आणि हाच अमूल्य वेळ आपण अध्ययन-अध्यापनासाठी वापरू शकतो. कार्यालयीन काम सोपे, सुटसुटीत व्हावे यासाठी मी वेगळ्या प्रकारच्या एक्सेल फाइल बनवल्या आहेत.
याशिवाय कोविड१९ संसर्गामुळे शाळा बंद आहेत. या काळात विद्यार्थ्यांना घरच्या घरी अभ्यास करता यावा म्हणून दैनंदिन घरचा अभ्यास असणाऱ्या १ ली ते ७ वी च्या पीडीएफ फाइल्स सुद्धा या ब्लॉग वर नियमित अपडेट केल्या जात आहेत.
या सर्व फाइल या व्यासपीठाच्या माध्यमातून मी आपणा सोबत शेअर करत आहे. या माझ्या शैक्षणिक फाईल तसेच या ब्लॉगवर प्रसिद्ध करण्यात आलेले माझे वेगवेगळे शैक्षणिक लेख, मार्गदर्शन पर लेख, आपणा सर्वांना कशी वाटली? यामध्ये आपणास आणखीन काही सुधारणा हवी?  हे मला नक्की कळवा...
किंवा आपण त्या लेखाच्या खाली आपली कमेंट देऊन सुद्धा तुमचे विचार आमच्यापर्यंत कळू शकता.
तुमच्या भेटीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद....!
आपलाच शिक्षक मित्र
सुनील सागरे



Post a Comment

5 Comments
  1. एक उत्तम उपक्रम सुरू केलेबद्दल अभिनंदन. याचा लाभ आमच्यासारख्या लाखो शिक्षकांना निश्चित होईल यात शंका नाही.धन्यवाद सर.-भाऊ कांबळे सर.

    ReplyDelete
  2. Very good activity conducted by your team.

    ReplyDelete
Post a Comment
To Top