विद्यार्थ्यांना घरी स्वयंअध्ययन करण्यास सोयीचे जावे म्हणून विविध प्रकारचे डिजिटल साहित्य, व्हिडीओ, शैक्षणिक अॅप उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाची पुस्तक निर्मिती संस्था असलेली बालभारती या संस्थेनेही याआधी १ ली ते ८ वी शालेय पाठ्यपुस्तके डिजिटल स्वरूपात ई-बालभारती या पोर्टल वर सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहेत. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर ९ वी ते १२ वी पर्यंतची पुस्तकेही मार्च २०२० पासून उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
बालभारतीने याआधीच्या पाठ्यक्रमासाठी स्वाध्याय पुस्तिका विकसित करून त्या विद्यार्थ्यांना मोफत पुरविल्या होत्या. पाठ्यक्रम बदलल्यानंतर मात्र हा उपक्रम बंद झाला. कारण अभ्यासक्रम बदल झाल्या मुळे या स्वाध्याय पुस्तिका निरुपयोगी झाल्या. सर्व अभ्यासक्रम बदलला तरी बदललेल्या अभ्यासक्रमातही गणित व इंग्रजी विषयाचा आशय व घटक मात्र जवळ जवळ तेच असतात. त्यामुळे इंग्रजी व गणित विषयाच्या स्वाध्याय पुस्तिका पहिली ते आठवी वर्गातील मुलांना सरावासाठी आजही उपयुक्तआहेत. या स्वाध्याय पुस्तिकांचे सरावासाठी असलेले महत्व आणि कोविड१९ मुळे शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरच्या घरी सराव व स्वयंअध्ययन करण्यासाठी या स्वाध्याय पुस्तिका बालभारतीने त्यांच्या ई-बालभारती या पोर्टल वर मोफत डाउनलोड साठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गांसाठी 'My First English-Marathi Dictionary' ही इंग्रजी पाठ्यपुस्तकातील सर्व शब्दांचे अर्थ असलेली डिक्शनरी सुद्धा सर्व शाळांमध्ये देण्यात आली होती. त्याचीही इ-पुस्तक स्वरूपातील प्रत बालभारतीच्या पोर्टल वर डाउनलोड साठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
खाली बालभारतीच्या संबंधित ई-पुस्तकांच्या डाउनलोड पेज च्या लिंकही वाचकांच्या सोयीसाठी देत आहोत.
स्वाध्याय पुस्तिका व आणखी शैक्षणिक फाइल्स मिळवण्यासाठी
ज्ञानवाहिनी या टेलिग्राम चॅनल चे सदस्य व्हा. सदस्य होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.