करदात्याला एकूण वार्षिक उत्पन्नावर(Gross Total Income) वर आयकर आकारला
जातो. मागील दोन वर्षापासून चालू असलेली आयकर स्लॅब पद्धती व या आर्थिक वर्षात जाहीर केलेली नवीन
आयकर स्लॅब पद्धती या दोन्हीमध्ये एकूण वार्षिक उत्पन्न काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.
एकाच करदात्याचे निव्वळ वार्षिक उत्पन्न दोन्ही आयकर स्लॅब पद्धती मध्ये वेगवेगळे येऊ शकते.
चालू आयकर स्लॅब पद्धती मध्ये एकूण वार्षिक उत्पन्न काढताना त्यातून खालील रकमांवर सवलत दिली जाते.
म्हणजेच या रकमा वजा केल्या जातात. स्टँडर्ड डिडक्शन (५०,००,००० रु) , घरभाडे, गृह कर्जावर वर्षभरात भरलेले व्याज रजा प्रवास सवलत(LTC), व्यवसाय कर इत्यादी.
(आयकारातून घरभाडे सवलत मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात)
उदाहरणार्थ एखाद्या करदात्याची सर्व उत्पन्नांच्या साधनांपासून होणारी वर्षभरातील मिळकत ७,००,००० रु आहे.
म्हणून करपात्र वार्षिक उत्पन्न काढण्यासाठी या सात लाख रुपयामधून विहित रकमा वजा करून करपात्र
वार्षिक उत्पन्न मिळते.
एकूण करपात्र वार्षिक उत्पन्न कसे काढावे याची सविस्तर माहिती व नियम येथे वाचा
समजा या करदात्याने वर्षभरात गृहकर्जासाठी ४०,००० व्याज भरले आहे. व व्यवसाय कर १४४४ रु भरला आहे.
आणि कोणतेही घरभाडे अथवा रजा प्रवास खर्च केलेला नाही,
तर
करदात्याच्या वर्षभरातील मिळकतीतून वजा होणारी रक्कम =
५०,००,००० रु ( स्टँडर्ड डिडक्शन)+ ४०,००० (गृहकर्ज व्याज) + १४४४ (व्यवसाय कर)
= ९१,४४४ रु
कारादात्यचे करपात्र एकूण वार्षिक उत्पन्न = ७,००,००० - ९१,४४४
=६,०८,५५६ रु इतके होईल.
या आलेल्या एकूण करपात्र वार्षिक उत्पन्नावर आयकर काढण्यापूर्वी चालू आयकर स्लॅब पद्धतीमध्ये काही विविध
सेक्शन अंतर्गत लागू असलेले विविध प्रकारचे १०० प्रकारचे टॅक्स डिडक्शन वजा केले जातात. यामध्ये मुख्यतः
भविष्य निर्वाह निधीसाठी वर्षभर भरलेले हप्ते, विमा हप्ते, सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवलेली रक्कम, पाल्यांची शिक्षण फी,गृहकर्जापोटी भरलेली मुद्दल यांचा समावेश असतो.
याशिवाय आणखी कोणकोणते टॅक्स डिडक्शन असतात, त्यावरील करमुक्त गुंतवणूक मर्यादा किती याची सविस्तर माहिती येथे वाचा
समजा आपण वर उल्लेख केलेल्या करदात्याने भविष्य निर्वाह निधी मध्ये वर्षभरात २४,००० रु आणि विमा हप्त्यापोटी ३५,००० रु गुंतवलेले आहेत. म्हणजेच त्याचे एकूण टॅक्स डिडक्शन खालील प्रमाणे येईल.
एकूण टॅक्स डिडक्शन = २४,००० + ३५,००० = ५९,००० रु
आता करपात्र उत्पन्न काढूया, यासाठी आपल्याला करपात्र वार्षिक उत्पन्नातून सर्व टॅक्स डिडक्शन ची एकूण वजा करावी लागेल.
निव्वळ करपात्र उत्पन्न = ६,०८,५५६ - ५९,०००
= ५,४९,५५६ रु
चालू आयकर स्लॅब पद्धतीनुसार वरील रकमेवर २०% प्रमाणे आयकर आकारला जातो , आता आपण ५,४९,५५६ रु या रकमेवरील एकूण देय आयकर काढूयात.
२,५०,००० पर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर आयकर आकारला जात नाही. आणि २,५०,००० ते ५,००,००० पर्यंत ५ टक्के
आयकर आकारला जातो. व ५,००,००० च्या पुढील रकमेवर २०% दराने आयकर आकारला जातो.
५ % दराने आयकर काढायची रक्कम = २,५०,००० x ०.०५
बसणारा आयकर = १२,५०० रु
२० % दराने आयकर काढायची रक्कम = ४९,५५६ x ०.२०%
= ९९११ रु
एकूण आयकर = १२,५०० +९९११ = २२,४११ रु
या गणन केलेल्या आयकरावर ४% दराने आरोग्य व शिक्षण अधिभार आकारला जातो.
शिक्षण अधिभार = २२,४११ x ०.०.४
=८९६ रु
म्हणजेच एकूण देय आयकर रक्कम ही २३३०७ रु असेल.
अशा पद्धतीने आपणही चालू(जुन्या) स्लॅब पद्धतीनुसार तुम्हाला या वर्षी बसणारा आयकर काढू शकता..