या वर्षी आयकर विभागाने करदात्यांना आयकर भरण्यासाठी दोन प्रकारचे टॅक्स स्लॅब उपलब्ध करून दिले आहेत. करदाता आपल्या सोयीनुसार दोन्ही पैकी कोणताही एक टॅक्स स्लॅब आयकर भरण्यासाठी निवडू शकतो.
पहिला आहे 2020-21 या आर्थिक वर्षात जाहीर केलेला नवीन टॅक्स स्लॅब , याशिवाय दूसरा पर्याय म्हणजे करदाता पूर्वीपासुन वापरत असलेला चालू टॅक्स स्लॅब चा पर्यायही निवडू शकतो.
जुन्या आयकर स्लॅब नुसार कर गणना करताना आयकरचे दर जास्त आहेत पण करदाता विविध प्रकारच्या टॅक्स डिडक्शन द्वारे आयकर बचत करू शकतो. तर नवीन आयकर स्लॅब नुसार आयकर दर कमी आहे पण या पर्यायामध्ये आपण कोणताही टॅक्स डिडक्शन वापरुन आयकरात सूट मिळवता येत नाही.
यापैकी कोणता आयकर स्लॅब जास्त फायदेशीर असेल हे जाणून घेण्यासाठी सुरुतीला दोन्ही टॅक्स स्लॅब बद्दल
सविस्तर माहिती घेऊयात.
पहिल्यांदा आपण चालू आयकर स्लॅब बद्दल माहिती घेऊया.
१) चालू आयकर स्लॅब पद्धती(आर्थिक वर्ष 2019-20 )
चालू आयकर स्लॅब पद्धतीनुसार आपल्या वार्षिक उत्पन्नानुसार खालील प्रमाणे आयकर आकारला जातो.
वार्षिक उत्पन्न आयकराचा दर
२,५०,००० रु. किंवा त्यापेक्षा कमी लागू नाही
२,५०,००० रु. ते ५,००,००० पर्यंत ५ %
५,००,००० रु ते १०,००,००० रु २० %
१०, ००,००० रु पेक्षा जास्त ३० %
चालू आयकर स्लॅब पद्धती मध्ये आयकराचे दर जरी जास्त असले तरी वार्षिक ५०, ००,००० रु स्टॅन्डर्ड डिडक्शन,
सेक्शन 80C अंतर्गत लागू होणारे व इतर टॅक्स डिडक्शन लागू होतात.
याशिवाय वार्षिक उत्पन्न काढताना गृह कर्ज हप्ता (मुद्दल) , रजा प्रवास सवलत, घरभाडे सवलत इत्यादी
सवलती लागू होतात.
त्यामुळे कर बचत होते.
२) नवीन आयकर स्लॅब पद्धती
चालू आयकर स्लॅब पद्धती शिवाय करदाता आर्थिक वर्ष 2020 - 21 मध्ये घोषित केलेली नवीन आयकर स्लॅब पद्धती नुसार ही
आयकर भरण्याचा पर्याय निवडू शकतो. या नवीन स्लॅब पद्धतीचे आयकराचे दर खालील प्रमाणे आहेत.
वार्षिक उत्पन्न आयकराचा दर
२,५०,००० रु. किंवा त्यापेक्षा कमी लागू नाही
२,५०,००० रु. ते ५,००,००० पर्यंत ५ %
५,००,००० रु. ते ७,५०,००० पर्यंत १० %
७,५०,००० रु. ते १०,००,००० पर्यंत १५ %
१०,००,००० रु. ते १२,५०,००० पर्यंत २० %
१२,५०,००० रु. ते १५,००,००० पर्यंत २५ %
१५,००,००० रु पेक्षा जास्त ३० %
नवीन आयकर स्लॅब पद्धती मध्ये चालू स्लॅब पद्धती पेक्षा आयकर दर कमी असला तरी वार्षिक उत्पन्न काढताना लागू होणाऱ्या सवलती, टॅक्स डिडक्शन, वार्षिक ५०, ००,००० रु स्टॅन्डर्ड डिडक्शन ई. लागू होत नाही. त्यामुळे करदात्याला कर बचत करता येत नाही.
नवीन व जुन्या अशा दोन्ही आयकर स्लॅब पद्धती मध्ये आयकरावर मिळणारा रिबेट, बसणारा सरचार्ज आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी स्लॅब मधील वाढीव वार्षिक उत्पन्नामधील सूट समान आहे. त्याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.
ज्येष्ठ नागरिक : ६० वर्ष पेक्षा जास्त वय असणाऱ्या करदात्याला करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २,५०,००० ऐवजी ३,००,००० रुपये एवढी आहे.
तर ८० वर्ष वयापेक्षा जास्त करदात्यांसाठी हीच मर्यादा ५,००,००० रु आहे.
रिबेट : यामध्येही जर करदात्याचे वार्षिक उत्पन्न जर ५ लाखापेक्षा कमी असेल तर त्याला बसणाऱ्या आयकरावर आयकर सेक्शन 87A अंतर्गत १२,५०० रुपये
रिबेट(सूट) दिला जातो. पण जर तुमचे उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर हा रिबेट लागू होत नाही. उदा. एखाद्या करदात्याचे
उत्पन्न जर ५,००,००१ रुपये असेल तर अशा करदात्यालाही हा रिबेट लागू होत नाही, अशा करदात्यालाही वार्षिक रकमेनुसार ५% दराने
लागू होणारा १२,५०० रु आयकर भरावा लागतो.
अधिभार : याशिवाय करदात्याला बसलेल्या आयकरावर ४ % दराने आरोग्य व शिक्षण अधिभारही भरावा लागतो.
सरचार्ज : आरोग्य व शिक्षण अधिभाराशिवाय जर करदात्याचे उत्पन्न ५० लाख ते १ कोटी पर्यंत असेल तर त्याला बसणाऱ्या आयकरावर १० %
अतिरिक्त करही (सरचार्ज) द्यावा लागतो. २ कोटी पर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांसाठी याच सरचार्ज चा दर १५% आहे.
तर ५ कोटी पर्यंत वार्षिक उत्पन्नासाठी २५% व ५ कोटी पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करदात्याला ३७% सरचार्ज द्यावा लागतो.